सांगली : महाराष्ट्राचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या सोहळ्याचा आनंद सांगलीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या स्क्रिनद्वारे अनुभवला. फडणवीस यांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी टिळक चौकामध्ये साखर, पेढे वाटून आणि फटाक्यांची आताषबाजी करून आनंद व्यक्त केला. येथील टिळक चौकातील टिळक स्मारक मंदिर येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते.महाराष्ट्रात भाजप आणि शिवेसेनचे युतीची १९९५ मध्ये सत्ता आली होती. यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद होते. परंतु, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रथमच भाजपकडे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. या सोहळ्यास जाता आले नाही, अशा कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम पहाता यावा म्हणून टिळक स्मारक मंदिर येथे मोठा टीव्ही स्क्रीन बसविला होता. तेथे भाजपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी टिळक चौकात नागरिकांना साखर, पेढे वाटले. भाजपचे प्रकाश बिरजे, केदार खाडीलकर, मकरंद म्हामूलकर, अतुल गिजरे, शरद नलवडे, नाना शिंदे, प्रवीण शिंदे, सतीश गोरे, अलका एडके, मनीषा काळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सांगलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
By admin | Published: October 31, 2014 11:49 PM