सांगली : उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे रखडलेल्या जत, पलूस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडी ‘ती’ गावे वगळून आता होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उमराणी (ता. जत) आणि पलूस तालुक्यातील दह्यारी व रामानंदनगर ही गावे वगळून इतर ठिकाणी मंगळवारी (दि. १६) निवडी होणार आहेत. यासाठी तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
सरपंच निवडीच्या आरक्षणावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने जत व पलूस तालुकावगळता इतर ठिकाणी मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडी पार पडल्या होत्या. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याचिका दाखल केलेल्या उमराणी, दह्यारी व रामानंदनगरमधील सरपंच /उपसरपंच निवडीबाबत नंतर आदेश देण्यात येत आहेत तर इतर गावात मंगळवारी निवडी होणार आहेत. याठिकाणी निवडी पार पाडण्यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.