सांगली : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातील वाड्या-वस्त्यांपासून मोठ्या गावांतील सरपंचांनी प्रस्तावाचा अक्षरश: पाऊस पाडला. अत्यंत कमी कालावधित सव्वातीनशे प्रस्ताव ‘लोकमत’कडे प्राप्त झाले. हा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा शुक्रवार, दि. २९ रोजी सांगलीत होणार आहे.
या ३२५ प्रस्तावांमधून १३ विजेते निवडण्यासाठी निवड समिती कार्यरत झाली आहे. जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी महालिंग जाधव, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एन. बी. पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण विभागाच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष दगडे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक विजय पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या राष्टÑीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय ठिगळे यांची निवड समिती सरपंचांनी पाठविलेल्या प्रस्तावांचा बारकाईने अभ्यास करीत आहे.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही पहिली पायरी असते. गावाचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी अनेक सुहृदयी स्थानिक राजकारणी अत्यंत कौशल्याने धोरणे ठरवत असतात. अनेक गावे स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या गावांचा गौरव व्हावा आणि त्यातून इतर गावांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘लोकमत’ने ही आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे.
जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या वेगवेगळ्या निकषान्वये प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तब्बल ३२५ प्रस्ताव ‘लोकमत’ कार्यालयाकडे प्राप्त झाले.
जलव्यवस्थापनात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत, पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन, वीज व्यवस्थापनात गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीजनिर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक सुविधेत गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयोग, स्वच्छतेबाबतीत प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रूप, कचरा संकलन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठी केलेले प्रयोग, लसीकरण, साथीच्या रोगांबाबत व्यवस्थापन, पायाभूत सेवांमध्ये रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, बाजार या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोय, ग्रामरक्षणमध्ये तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला, युवती, बालसुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना, पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कुºहाडबंदी, चराईबंदी, जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण, प्रशासनामध्ये पंचायतीकडून दिल्या जात असलेल्या आॅनलाईन सेवा, विकास कामांत लोकसहभाग, तर रोजगार निर्मितीमध्ये ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेती कंपन्या, सामूहिक शेती, कृषी तंत्रज्ञानामध्ये प्रक्रियेत सुधारणा, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग, उदयोन्मुख नेतृत्वामध्ये सरपंचांनी सर्वच कामांत दिलेले योगदान तसेच सरपंच आॅफ द इयरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असेल, अशा स्वरुपातील माहितीपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले.या इत्यंभूत माहितीसह प्रस्ताव दाखल झाले. गावोगावच्या सरपंचांनी केलेले काम एखाद्या डॉक्युमेंटरीच्या स्वरुपात मांडले.असा होणार सोहळा...‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान सोहळा शुक्रवार, दि. २९ डिसेंबररोजी सकाळी १० वाजता सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाशेजारी असणाºया डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये होणार आहे. या सोहळ्यास महाराष्टÑाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील आणि पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष आ. शिवाजीराव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तंटारहित विकासाला प्राधान्यजिल्ह्यातील काही गावांनी तंटामुक्तीच्याबाबतीत चांगले काम केले आहे. गावातील वाद गावातच मिटवून गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी या गावांनी वेगळा पायंडा पाडलेला आहे, हे या प्रस्तावांतून प्रकर्षाने पुढे येताना दिसते.आमची शाळा राखू गुणवत्तापटसंख्येअभावी ओस पडणाºया शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र सांगली जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी ग्रामशिक्षण समितीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी आलेल्या प्रस्तावांचा बारीक अभ्यास करण्यात दंग असलेली निवड समिती. डावीकडून प्रा. संजय ठिगळे, एन. बी. पाटील, प्रा. सुभाष दगडे, प्रा. विजय पाटील, महालिंग जाधव, छायाताई खरमाटे.