पंचायत समितीच्या सभागृहात जतचे प्रांताधिकारी
प्रशांत आवटे, तहसीलदार बी. जे. गोरे, नायब तहसीलदार विलास भिसे यांच्या उपस्थितीत पाच वर्षीय मुलाच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये नुकत्याच झालेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती सर्वसाधारण जागेसाठी आहेत. यामध्ये देशिंग व ढालगाव या दोन मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हिंगणगाव, खरशिंग, रांजणी, मळणगाव येथे सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने होण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यातील प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती : शिंदेवाडी घो, विठूरायाची वाडी, गर्जेवाडी, घोरपडी,
अनुसूचित जाती महिला : आगळगाव, लंगरपेठ, लांडगेवाडी, मोरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग : म्हैसाळ एम, चोरोची, कुची, चुडेखिंडी, कोंगनोळी, अलकुड एम, मोघमवाडी, करलहट्टी
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : जाखापूर, तिसंगी, हरोली, आरेवाडी, निमज, जांभूळवाडी, बनेवाडी, शिंदेवाडी (हिं)
सर्वसाधारण : झुरेवाडी, ढालेवाडी, करोली टी, नागज, घाटनांद्रे, देशिग, ढालगाव, कोकळे, केरेवाडी, कुकटोळी, दुधेभावी, शेळकेवाडी, कदमवाडी,
सर्वसाधारण महिला : वाघोली, हिंगणगाव, कुंडलापूर, खरशिंग, रांजणी, इरळी, शिरढाेण, जायगव्हान, जाधववाडी, ढोलेवाडी, नांगोळे, बोरगाव, अलकुड एस, अग्रण धुळगाव, रायवाडी, मळणगाव, सराटी, थबडेवाडी, बसाप्पाचीवाडी, पिंपळवाडी, रामपूरवाडी.