शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

खानापुर तालुक्यातील १८ गावांतील सरपंचपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:18 AM

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर तालुक्यातील ६४ गावांच्या ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी विटा तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : खानापूर तालुक्यातील ६४ गावांच्या ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी विटा तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. २०११ च्या जनगणनेनुसार आणि १९९५ पासूनची आधी पडलेली आरक्षणे पाहून या सोडती काढण्यात आल्या. आवश्यक तिथे उदय पवार या सहा वर्षांच्या मुलांकडून चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील १८ गावांमधील सरपंचदपद खुले झाले आहे.

तालुक्यातील भाग्यनगर, चिंचणी मं, घोटी खुर्द, हिवरे, रामनगर येथे अनुसूचित जाती महिला. पोसेवाडी, भाळवणी, सांगोले, मेंगाणवाडी ही अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. बलवडी भा., भिकवडी बु., धोंडगेवाडी, ढवळेश्वर, मंगरूळ, रेणावी, जाधववाडी, धोंडगेवाडी, वेजेगाव येथे नागरिकांचा माग्स प्रवर्ग महिला. तर बलवडी खा, पळशी, तांदळगाव, जोंधळखिंडी, वलखड, बेनापूर, चिखलहोळ, वासुंबे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

बानूरगड, राजधानी भेंडवडे, वाझर, गार्डी, पारे, ताडाचीवाडी, भांबर्डे, शेंडगेवाडी, कलंबी, घोटी बु., खांबाळे भा, कुर्ली, सुलतानगादे, मादळमुठी, साळशिंगे, लेंगरे, हिंगणगादे, मोही, देवीखिंडी या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला सरपंच होणार आहेत, तर उर्वरित करंजे, भूड, गोरेवाडी, घानवड, कमळापूर, पंचलिंगनगर, रेवनगाव, भेंडवडे (गावठाण) माहुली, भडकेवाडी, देवनगर, नागेवाडी, जखिनवाडी, वाळूज, आळसंद, ऐनवाडी, कार्वे, बामणी, जाधवनगर येथील सरपंचपद खुले झाले आहे.