विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहिती अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्याचेही अॅड. मुळीक यावेळी म्हणाले.ते म्हणाले, महाराष्टÑ शासनाने ग्रामपंचायत कायद्यात दुरूस्ती करून सरपंचाची थेट निवड करण्याचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार निवडून आलेला सरपंच पदसिध्द सदस्य असल्याने आणि उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल, अशी तरतूद होती.
या तरतुदीच्या अनुषंगाने उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसºया व निर्णायक मताचा वापर करता येईल किंवा कसे याबाबत शासनाकडे विविध ठिकाणांहून मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर शासनाने दि. १ नोव्हेंबररोजी उपसरपंच निवडणुकीच्या फेरीमध्ये सरपंचांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र या फेरीतील उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, असे कक्ष अधिकाºयांनी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना कळविले होते. त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले होते.
त्यामुळे शासनाच्या दि. १ नोव्हेंबरच्या परिपत्रकास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई व शिंदेवाडी (घोरपडी) येथील सरपंच आक्काताई भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवार, दि. १५ जून रोजी निर्णय देताना शासनाचे परिपत्रक रद्द करून सरपंचांना उपसरपंच निवडीत सदस्य म्हणून एक आणि समसमान मते मिळाल्यास निर्णायक एक मत देण्याचा अधिकार दिला असल्याचे अॅड. मुळीक यांनी सांगितले.
बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले...खानापूर तालुक्यातील कमळापूर, बलवडी (खा.) मादळमुठी, मिरज तालुक्यातील वड्डी, जत तालुक्यातील बेळुंखी, रामपूर, देवनाळ, साळमळगेवाडी, रेवनाळ या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीला याचिकेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच सांगलीच्या जिल्हाधिकाºयांकडे तासगाव तालुक्यातील पुणदी, वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष व काळमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (हिंगणगाव) येथील उपसरपंच निवडीबाबतच्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती अॅड. मुळीक यांनी दिली.