शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जयंतराव गटाच्या माघारीने ‘सर्वोदय’ बिनविरोध

By admin | Published: June 07, 2017 12:11 AM

जयंतराव गटाच्या माघारीने ‘सर्वोदय’ बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील गटाने मैदानातून माघार घेतल्याने, केवळ संभाजी पवार गटाच्याच पॅनेलचे अर्ज दाखल झाले. यातील ब वर्ग व महिला गटातील तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून छाननीनंतर पवार गट संचालकांची नावे जाहीर करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्या संघर्षाच्या कहानीमुळे संपूर्ण राज्यात कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय कारखान्याचा वाद गाजत आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सध्या या कारखान्याचा ताबा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू कारखान्याकडे आहे. कारखान्याला अडचणीच्या काळात आर्थिक मदत केल्यानंतर ताबा ‘राजारामबापू’कडे गेला होता. ताब्यावरून जयंत पाटील यांच्यावर पवार गटाने अनेकदा टीका केली. दोन्ही गटांचा न्यायालयीन संघर्षही सुरू आहे. त्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.वादामुळे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र जयंत पाटील गटाने निवडणुकीचे मैदान न लढविण्याचा निर्णय घेतला होता. कारण निवडणूक न लढविताही कारखाना त्यांच्याच ताब्यात राहणार असल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणूक औपचारिकता बनली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केवळ पवार गटाचेच ३५ अर्ज दाखल झाले. परिणामी निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले. अर्जांची छाननी बुधवारी, ७ जूनरोजी होणार आहे. त्यानंतर राहिलेल्या अर्जांमधून संचालकांची नावे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यामार्फत जाहीर केली जाणार आहेत. ----यांचे अर्ज दाखल... आष्टा उत्पादक गटातून दौलत थोटे, लक्ष्मण धनगर, आप्पासाहेब थोटे, संभाजी पाटील, पोपट शळके, बावची गटातून प्रकाश जाधव, बाजीराव पाटील, राजाराम पाडळकर, छायादेवी बारवडे, नितीन बारवडे, रणजित थोरात, तुंग गटातून आप्पासाहेब काटकर, तात्यासाहेब तामगावे, सनतकुमार आडमुठे, भरत साजणे, माणिक आवटी, शीतल आप्पासाहेब पाटील, महावीर चौगुले, शीतल भूपाल पाटील, हरिपूर गटातून महावीर चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज पवार, संभाजी पवार, नरवाड गटातून सागर पाटील, पवनंजय पाटील, राजकुमार पाटील, विष्णू पाटील, विकास पाटील, बाळकृष्ण पाटील, इतर मागासवर्ग गटातून हाशमुद्दीन मुलाणी, भटक्या विमुक्त जाती, जमातीतून लक्ष्मण बिरू धनगर, पोपट शेळके यांचे अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध झालेले संचालकबिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था गटातून शलाका सतीश पवार, महिला गटातून सुमन पाटील आणि सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली.