वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस वास्को येथून दुपारी ३ वाजता सुटेल. ही गाडी मिरजेत रात्री १०.४० वाजता व सांगलीत १०.५७ वाजता येईल. ही गाडी निजामुद्दीन येथे तिसर्यादिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी निजामुद्दीन येथून दुपारी २.५० वाजता सुटेल. सांगलीत दुसऱ्यादिवशी रात्री ९.४५ वाजता व मिरजेत रात्री १०.४० वाजता येईल. ही एक्स्प्रेस वास्को येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल. हे बदल दि. २३ डिसेंबरपासून होणार आहेत.
हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस हुबळी येथून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मिरजेत रात्री १०. १० वाजता व सांगलीत रात्री १०.२७ वाजता येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्यादिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९.२० वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस सांगलीत पहाटे ५ वाजता व मिरजेत ५.४५ वाजता येईल. हुबळी येथे रात्री ११.३६ वाजता पोहोचेल. दि. २४ डिसेंबरपासून हा बदल होणार असून, ही एक्स्प्रेस सातारा स्थानकात मध्यरात्री पोहोचत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे. यामुळे हुबळी-कुर्ला एक्स्प्रेसचा थांबा रद्द करण्यात येत आहे.