शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

By admin | Published: June 28, 2015 11:38 PM

डोकेदुखी वाढली : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; पोलीस दूरक्षेत्र मजबुतीकरणाची गरज

कोरेगाव : ब्रिटीशकाळापासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सातारारोडची वाटचाल संवेदनशीलतकडे सुरु आहे. सातत्याने भांडणे आणि तणाव यामुळे सातारारोड पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी बनत असून, नागरिकांचे जीवनमानही बदलत चालले आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या गावाचे रुपडे पालटू शकलेले नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या पोलीस दूरक्षेत्राच्या मजबुतीकरणाबरोबरच तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यावाढविण्याची गरज आहे. मुंबई इलाख्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सर धनजीशा कूपर यांनी रेल्वेमार्गाचे नेटवर्क पाहून सातारारोड येथे नांगर कारखाना उभा केला. कालांतराने त्यामध्ये भरभराट होत गेली आणि सातारारोड ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनीही सातारारोडला काही काळ वास्तव्य केले होते. १९७० च्या दशकामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारारोड येथील रेल्वेस्थानक बंद करत रेल्वेमार्ग बदलला आणि तो साताऱ्यासाठी क्षेत्रमाहुली येथे नेला. त्यानंतर सातारारोडची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. कूपर यांची एकमेव फौंड्री तेथे राहिली. कूपर यांच्याकडून ती शेठ वालचंद हिराचंद यांच्या समूहाने विकत घेतली आणि त्याचे नामकरण वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असे झाले. या कारखान्यातील कामगार युनियनसह अन्य संस्थांमुळे सातारारोडची राजकीय हालचाल वाढू लागली आणि तेथून युनियनवाद आणि राजकीय चढाओढ यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस असा संघर्ष गेले काही वर्षे या गावात पाहावयास मिळत आहे. युनियन वादातून आणि वाळूच्या कारणावरुन गेल्या दोन ते तीन वर्षात सातारारोडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती अनेकवेळा राहिली आहे. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने प्रशासन या गावाकडे अपेक्षेएवढे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र उपनिरीक्षक हवा...सातारारोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत व मोठा परिसर आहे. या दूरक्षेत्रासाठी आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलाकडून देण्यात येत नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी तेथे काम पाहत आहेत. सातारारोडसह पंचक्रोशीतील वीसहून अधिक गावांचा कारभार या दूरक्षेत्रातून चालत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस दलाच्या नियमाप्रमाणे तेथे स्वतंत्रपणे पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती होणे अपेक्षित आहे; मात्र तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. वायदंडे यांची बदली झाल्यानंतर हे पदच रिक्त राहिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने तेथे स्वतंत्र उपनिरीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.