साटपेवाडीने कोरोनाच्या काळात एकही व्यक्ती गमावलेली नाही. गावातील ४५ वर्षे वयोगटातील ९८ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळेच मृत्यू व रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे मत येथील उपकेंद्राच्या डाॅ. सुवर्णा साळुंखे यांनी सांगितले.
घरोघरी जाऊन लसीकरणाला प्रवृत्त केले. जनतेनेही चांगली साथ दिल्याने हे शक्य झाले आहे, असे डाॅ. साळुंखे यांनी सांगितले. सरपंच सौ. सुरेखा साटपे व दक्षता समितीचे सहकार्य लाभले आहे.
सरपंच साटपे म्हणाल्या की, कोरोनावर मात करण्यासाठी गावाने मोलाचे सहकार्य केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली. विवाह व अंत्यसंस्कार विधी मोजक्याच लोकांत करण्याचा नियम केला. गावात औषध फवारणी केली. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. गावातील सर्व मुलांचे सर्व खेळ बंद केले. गावातील बैठकीची सर्व बाकडी हटविली.