शिराळा : सत्यजित देशमुख यांनी खोटे बोलून शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करू नये. करंजवडे - चिकुर्डे रस्त्याच्या कामाचे दोन कोटीचे पत्र दिले म्हणतात. मग दोन कोटींच्या कामांना पाच कोटी कसे मिळाले, याचा विचार करा. या रस्त्याच्या कामासाठी मीच पत्र दिले आणि पाच कोटी मंजूर झाले. विधानसभेच्या अधिवेशनात आमदारांच्या पत्राचा प्रथम विचार केला जातो. तुम्ही आधी आमदार व्हा, मग पत्र द्या, असा टोला आमदार मानसिंगराव नाईक यांनी भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांना लगावला.शिराळा विधानसभा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुचविलेल्या ४२ कोटी ८९ लाख ६२ हजार ६७२ कोटींच्या कामांना हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली, याबाबत चिखली (ता. शिराळा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नाईक म्हणाले, शिराळा येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी असलेल्या शासकीय विश्रामगृहासाठी २२.२५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर करुंगली येथील वारणा नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी ६७.१३ लाख रुपये, पेठ - महादेववाडी - माणिकवाडी रस्त्यासाठी १० कोटी रुपये, वाघवाडी - कुरळप रस्ता ५ कोटी, करंजवडे चिकुर्डे येथे पूल व रस्त्यासाठी ५ कोटी, शिंदेवाडी मांगरुळ रस्ता २.२५ कोटी, मणदूर - धनगरवाडा रस्ता १.७५ कोटी रुपये,
शिरशी - मानकरवाडी रस्ता १ कोटी, ढोलेवाडी - खवरेवाडी रस्ता २.५० कोटी, पाडळेवाडी निगडी रस्ता व पूल २.५ कोटी, वाकुर्डे बुद्रुक - पडवळवाडी पूल व रस्ता २ कोटी, माणिकवाडी - करंजवडे रस्ता २.५ कोटी, येळापूर - दीपकवाडी पूल व रस्ता २ कोटी, चिकुर्डे भोसलेवाडी पूल २ कोटी, कामेरी - खांबे मळा रस्ता १.५ कोटी असा ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे असताना देशमुख यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.