सांगली : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ३६ पिकांसाठी असून, राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे आहे. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठी पहिले बक्षीस पाच लाख रुपयांचे आहे.शेतीत सतत येणाऱ्या संकटांना एकट्याने नाही तर एकीने लढा देण्यासाठीचा प्रयत्न समृद्ध शेतकरी आणि समृद्ध निसर्ग यांची सांगड घालू पाहणारी एक लोकचळवळ आहे. फार्मर कप म्हणजे गटशेतीची स्पर्धा आहे. गटशेतीमध्ये किमान ११ सदस्य आणि किमान १५ एकर क्षेत्र असणारा कोणताही गट स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.या स्पर्धेचा प्रमुख हेतू म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आहे. मजुरी खर्चात बचत करण्यासह स्वस्तात खते आणि बियाण्याची उपलब्धता करण्याचा हेतू आहे, अशी माहिती पानी फाउंडेशनचे प्रशांत गवंडी यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी संघटित शेती करून उत्पादकता वाढविण्यासाठी फार्मर कप स्पर्धा आहे. यात राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे असून, दुसरे बक्षीस १५ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस १० लाख रुपयांचे असणार आहे.
असे आहे बक्षीसराज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाखदुसरे बक्षीस १५ लाखतिसरे बक्षीस १० लाख
सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे पहिले बक्षीस ५ लाखसर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे दुसरे बक्षीस ३ लाखसर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे तिसरे बक्षीस २ लाख
तालुकास्तरीय बक्षिसेपहिले बक्षीस ५० हजार रुपयेउत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी २५ हजार रुपये
स्पर्धेत या पिकांचा समावेशस्पर्धेत बाजरी, सोयाबीन, वाटाणा, भेंडी, टोमॅटो, धणे, तूर, गवार, रताळे, मका, कापूस, बटाटा, कांदा, कारले, कोथिंबीर, भुईमूग, नाचणी, दोडके, भात, मूग, कोबी, तोंडली, दुधी भोपळा, मिरची, वांगी, उडीद, पालक, ज्वारी, राजमा-घेवडा, फुलकोबी, ओवा, पडवळ, मेथी, भोपळा, शिमला मिरची, घोसावळी आदी पिकांचा समावेश आहे.