सांगली : पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोलांच्या तालावर लेझीम पथकाचा ताल धरायला लावणारा ठेका आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांंच्या जयघोषात शुक्रवारी सायंकाळी ३० व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेने उत्साहात सुरूवात झाली. एकाचवेळी सांगलीत दोन ठिकाणी आणि मिरजेत अशा शोभायात्रा व ग्रंथदिंडी निघाल्याने शहरातील वातावरण उत्साहित झाले होत.विश्रामबाग येथील सावरकर प्रतिष्ठानच्या प्रांगणात ३० व्या सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २२ पर्यंत चालणाऱ्या या संमेलनाची सुरूवात शुक्रवारी ग्रंथदिंडी व शोभायात्रेने झाली. सावरकर प्रशालेपासून ग्रंथदिंडीस सुरुवात झाली. आ. सुधीर गाडगीळ व इतर यात सहभागी झाले होते.शोभायात्रेच्या पुढे सावरकर यांची भव्य प्रतिमा होती. यानंतर विद्यार्थिनींचे लेझीम व झांजपथक होते. त्यानंतर ट्रॉलीमध्ये पारंपरिक वेशभूषेतील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सावरकरांच्या जीवनावरील चित्ररथ होता. ऐंशीफुटी रस्ता, स्फूर्ती चौक, एमएसईबी कॉलनी रस्ता, विश्रामबाग चौक मार्गे गणपती मंदिर व तेथून संमेलनस्थळी येऊन ग्रंथदिंंडी व शोभायात्रेचा समारोप झाला.ग्रंथदिंडी संपल्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विश्रामबाग येथे गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ आणि सिटी हायस्कूल येथे ‘मी येसू वहिनी बोलतेय’ या विषयावर प्रेरणा लांबे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शेखर इनामदार, सुयोग सुतार, विनायक सिंहासने, प्रकाश कुलकर्णी, विजय नामजोशी, विवेक चौथाई, बाळासाहेब देशपांडे, दीपक लेले उपस्थित होते. गावभाग येथील शोभायात्रा व ग्रंथदिंडीचे नियोजन भारती दिगडे यांनी केले.आज संमेलनात...आज, शनिवार संमेलनाचा मुख्य दिवस असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. सोलापूरचे खा. शरद बनसोडे, रघुनाथ कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष दा. वि. नेने उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वा. ‘सावरकरांचा विज्ञाननिष्ठ हिंदू राष्टÑवाद’ या विषयावर व्याख्यान, दु. १२.१५ वा. ‘सावरकरांच्या कल्पनेतील बलशाली भारत आणि सद्य:स्थिती’ या विषयावर परिसंवाद, दु. २ वाजता ‘जयोऽऽस्तुते’ विषयावर व्याख्यान, दु. ४ वाजता ‘डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकरांच्या दृष्टीतील जातीपल्याडचा भारत’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
सावरकर संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ: सांगली, मिरज शहरात शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:27 PM
सांगली : पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोलांच्या तालावर लेझीम पथकाचा ताल धरायला लावणारा ठेका आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांंच्या जयघोषात शुक्रवारी सायंकाळी ३० व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास ग्रंथदिंडी
ठळक मुद्देसावरकरप्रेमींचा उत्साही सहभाग; पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी