फोटो ओळ : विटा येथे डॉ. सविता सातपुते यांचा पीएच.डी. मिळाल्याबद्दल वैभव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
विटा : विटा येथील आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीमधील सविता संदीप सातपुते यांना शिवाजी विद्यापीठाची फार्मसी विषयातील पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. या यशाबद्दल त्यांचा लोकनेते माननीय हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाशिवराव पाटील, अध्यक्ष ॲड. वैभव पाटील व प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सविता सातपुते यांनी ‘आळू आणि सोनचाफ्यापासून सक्रिय घटकांचे पृथक्करण, गुणविशेषण आणि औषधीय मूल्यमापन’ या विषयावर संशोधन केले आहे. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगली येथून पूर्ण केले. त्या गेली १३ वर्षे अध्ययन व संशोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १० शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये तसेच परिषदांमध्ये सादर केले आहेत. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अविष्कार २०१९-२० मध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे.
त्यांना पीएच.डी.साठी कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील डॉ. प्रा. व्ही. सी. येलीगार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.