सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव व उपाध्यक्ष महादेव माळी यांनी ही माहिती दिली.
यावेळी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, शशिकांत भागवत, तुकाराम गायकवाड, हरिभाऊ गावडे, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे आदी उपस्थित होते.पुरस्कार विजेत्या शिक्षिका अशा : शीतल रास्ते (हाकेवाडी), शैलजा अौंधकर (निंबवडे, ता. आटपाडी), सुप्रिया शिंदे (खरशिंग), अनुराधा साळुंखे (जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), सुवर्णलता पाटील (मांगले), स्नेहा घाडगे (बहिरेवाडी, ता. शिराळा), कल्पना सावंत (अचकनहळ्ळी), गीतादेवी पाटील (संख, ता. जत), स्वाती पाटील (घबकवाडी), यास्मिन मुजावर ( आष्टा, ता. वाळवा ), शोभा मोरे (लिंब), लक्ष्मी जमदाडे (यमगरवाडी (ता. तासगाव), गीता केडगे ( कसबे डिग्रज), सुलोचना चव्हाण (खंडेराुजरी, ता. मिरज ), ज्योत्स्ना रसाळ (गुजलेवस्ती, लेंगरे), कमल मोरे ( भिकवडी बुद्रुक, ता. खानापूर), अरुणा हजारे ( विठ्ठलगर, अंकलखोप), सुनिता मोकाशी (आमणापूर, ता. पलूस), रुक्मिणी हराळे (वडियेरायबाग ), रुक्मिणी लोटे (कुंभारगाव, ता. कडेगाव), सुजाता जाधव ( विटा नगरपालिका), सुरेखा कदम (तासगाव नगरपालिका), माधुरी पाटील (मिरज), माधवी कांबळे (रामनामे विद्यालय, इस्लामपूर).पुरस्कार वितरण लॉकडाऊननंतरजिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्या शिक्षिकांची पुरस्कारासाठी समितीने निवड केली. सेवेचा कालावधी, शिष्यवृत्तीसाठी केलेले प्रयत्न, स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा यासह विविध उपक्रमांसाठी घेतलेल्या परिश्रमांची नोंद पुरस्कारासाठी घेतली. लॉकडाऊन पूर्ण शिथील झाल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.