शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

टंचाईची झळ अन् पडळकरांची कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:53 PM

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सावळज पूर्व भागातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पंधरा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या राष्टÑवादीच्या कारभाºयांनी गुरुवारी पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले.तासगाव तालुक्यातील भाजप आणि राष्टÑवादीसाठी हा अनुभव नवखा नाही. मात्र टंचाईची झळ लागत असतानाचा भाजपशी फारकत घेतलेले आटपाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच सावळजमध्ये येऊन खासदारांची काढलेली कळ मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. दुष्काळाचे खापर फोडण्यापासून ते झालेल्या कामाचे श्रेय घेण्यापर्यंत सर्वच मुद्द्यांवर राजकारण फिरलेले असते. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विसापूर, पुणदी योजनेच्या माध्यमातून काही गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे आकस्मिक निधन आणि राज्यासह देशातील सत्तांतर यामुळे राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या.सावळजसह परिसरातील गावांतील शेतकºयांकडून सातत्याने टेंभू योजनेत समावेशाची मागणी केली जात होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील सर्वच नेत्यांनी पाणीप्रश्न अस्मितेचा विषय केला होता. मात्र या भागात अद्याप पाणी आले नाही. किंबहुना काही गावांचा समावेश झाला, तर काही गावांचा समावेश झाला नाही. निवडणुकीच्या काळात आश्वासन देणाºया नेत्यांना प्रत्यक्षात पाणीप्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले.आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, गुरुवारी राष्टÑवादीच्या कारभाºयांनी लाक्षणिक उपोषण करून पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन बिगुल वाजवले. तालुक्यात गेल्या साडेचार वर्षात राष्टÑवादीने अनेक आंदोलने केली. मात्र सावळजचे आंदोलन भलतेच चर्चेत आले आहे.भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक आणि साडेचार वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीवेळी आर. आर. पाटील यांना ‘टार्गेट’ करणाºया गोपीचंद पडळकर यांनी सावळजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेषत: खासदार पाटील यांच्यावर निशाणा साधत, आमदार सुमनतार्इंच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही महिन्यांपासून खासदार आणि पडळकर यांच्यात संधी मिळेल तिथे एकमेकांवर तोंडसुख घेणे सुरू असतानाच, आता पडळकर यांनी थेट खासदारांच्या तालुक्यात येऊन, राष्टÑवादीच्या आमदारांना पाठबळ देत, खासदारांना आव्हान दिल्यामुळे, नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.