२९ संतोष ०२ : मिरजेत निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिनी डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : येथील निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रात स्किझोफ्रेनिया दिन साजरा झाला. यावेळी डॉ. चंद्रशेखर हळिंगळे म्हणाले, मेंदूतील रासायनिक घटकांचा समतोल बिघडल्याने हा विकार उद्भवतो. अनुवांशिकता, बालपणी झालेले आघात, पालकांची अतिकडक शिस्त, त्यांची भांडणे, एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट, लैंगिक शोषण, मानसिक छळ, ताणतणाव आदी कारणांनीही विकार उद्भवतो. कानात अनाकलनीय आवाज, संशय, असंबद्ध बडबड व वागणे, एक कृती वारंवार करणे अशी लक्षणे दिसतात.
ते म्हणाले की, योग्य औषधोपचार, विद्युत लहरींचा वापर, मानसोपचार व समुपदेशन, पुनर्वसन या मार्गांनी रुग्ण हमखास बरा होतो. नातेवाइकांनी त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. ‘मेंटल’ म्हणून हिणवू नये.
यावेळी डॉ. दीपक मुकादम, डॉ. प्रकाशकुमार मोरे, डॉ. दीपक माने, डॉ. श्रद्धा गायकवाड, सेजल बनसोडे, सत्यव्वा मगदूम आदी उपस्थित होते.