शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Sangli: सर्पदंशाने शाळकरी मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 11:57 AM

अचानक जागी होऊन 'ती' ओरडू लागली, कुटुंबीयांनी पाहिले तर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले; रुग्णालयात नेले पण..

संख : संख (ता.जत) येथील न्हावी वस्तीत राहत असलेल्या श्रेया श्रीशैल न्हावी (वय १५) या शाळकरी मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. श्रेयाच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.अधिक माहिती अशी, श्रेया ही संख येथील आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. काल रात्री ती नेहमीप्रमाणे लवकरच झोपी गेली. गावात वीजपुरवठा खंडित होता. रात्री आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाला. ती जागी होऊन ओरडू लागली. कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आणले. खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. न्हावी वस्तीवर आक्रोश करण्यात आला. तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. जत पूर्व भागात पावसाळ्यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :SangliसांगलीsnakeसापDeathमृत्यू