तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील प्रांजल प्रमोद माळी (वय 8) या शाळकरी मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. काल, मंगळवारी रात्री उशिरा घरी झोपली असता प्रांजल हिला विषारी सापाने दंश केला. प्रांजलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.सापाने दंश करताच प्रांजलला उपचारासाठी तात्काळ सावळज येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती अधिकच अत्यवस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्याचे डॉक्टरांनी सुचवले. दरम्यान उपचारापूर्वीच प्रांजलचा मृत्यू झाला.सावळज येथील एस. के. उनउने इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या प्रांजलच्या मृत्यूची बातमी सावळजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूमुळे सावळज गाव शोकाकुल झाले आहे. इतक्या लहान वयाच्या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. प्रांजलच्या मृत्यूने शाळेत आणि गावात शोककळा पसरली.
Sangli: झोपेत असतानाच सापाने दंश केला, सावळजमधील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:55 AM