शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शाळांचे पालकत्व अधिकाऱ्यांकडे..!

By admin | Published: August 29, 2016 10:45 PM

आयुक्तांचा नवा उपक्रम : खातेप्रमुखांना दिल्या महापालिकेच्या शाळा दत्तक

सांगली : महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पाऊल उचलले आहे. पालिकेच्या खातेप्रमुखांवर आता शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन दर्जात्मक बदल घडविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. सध्या महापालिका शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दरवर्षी शाळेची पटसंख्या राखतानाच अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यात शाळेत सुविधांचा दुष्काळ आहे. आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यात गोरगरिबांची मुले या शाळेत शिकत असल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. यावर आता आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीच उपाय शोधला आहे. पालिकेच्या सर्व खातेप्रमुखांना एक शाळा दत्तक दिली जाणार आहे. या शाळांची सर्वस्वी जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या २० शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक तास अथवा महिन्यातून दोनदा भेट द्यायची आहे. महिन्यातील एक दिवस या अधिकाऱ्याने शाळेत घालवायचा आहे. शाळेतील समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, शाळेचे प्रश्न सुटावेत, शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवावेत, शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे, मुलांचा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करावी, अशी विविध उद्दिष्ट्ये त्यांना देण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना पालकांशीही संवाद साधून शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजीही अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. शाळेचे नूतनीकरण व इतर खर्चाबाबतही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या पैशाऐवजी स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजकांचे सहकार्य घेऊन शाळेत बदल घडवून आणाला जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्याचेही सहकार्य घ्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आयुक्त मैदानातमहापालिकेच्या शाळांमधील दुर्दशा संपविण्यासाठी खुद्द आयुक्त खेबूडकरही मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्वत: शाळा नंबर ४२ दत्तक घेतली आहे. त्यांच्यासह उपायुक्त सुनील पवार, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, शहर अभियंता रवींद्र कांडगावे, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, मुख्य लेखापाल सुहासिनी पाटील अशा सर्वच अधिकाऱ्यांकडे त्यांनी शाळांची जबाबदारी सोपविली आहे.