सांगली : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, या प्रकरणी आणखी काही याचिकावर न्यायालयात १८ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबली आहे.
पालकांना १८ जून रोजी सुनावणी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेशासाठी ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली, पण त्याचा निकाल मात्र जाहीर करण्यात आला नाही. न्यायालयीन सुनावणीमध्ये काय निर्णय होतो यावर पुढील प्रवेश अवलंबून आहेत.
शनिवारपासून शाळा सुरु झाल्या, पण आरटीईमधून प्रवेशाच्या प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची अवस्था मात्र त्रिशांकुसारखीच राहिली आहे. कोणत्या शाळेत जायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे २३१ शाळांमधील १९०१ जागांसाठी २३६८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने आले आहेत.