सांगलीत रोटरी क्लबतर्फे माध्यमिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे सात माध्यमिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डाॅ. प्रमोद पाटील प्रमुख पाहुणे होते.
क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष संजय रानडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जगदीश कोळी (खवाटे हायस्कूल, अंकली), प्रीती बापट (सिटी हायस्कूल, सांगली), अस्मिता पोटे (राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, सांगली), वैशाली मगदूम (दडगे हायस्कूल, सांगली), रुक्साना मुलाणी (सैनिकी शाळा, तासगाव), संतोष फौजदार (पसायदान हायस्कूल, सांगली), संदीप वरठा (प्रज्ञाप्रबोधिनी, सांगली) या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक उपक्रमांसह सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या या शिक्षकांची निवड ‘रोटरी’च्या तज्ज्ञ सभासदांनी केली होती.
डॉ. प्रमोद पाटील म्हणाले की, सध्याच्या अत्यंत संवेदनशील काळात शिक्षकांचे समाजातील महत्त्व वाढले आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत घडविण्यासाठी स्वत:लादेखील अपडेट ठेवणे आवश्यक बनले आहे. विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक वाढत असल्याच्या काळात शिक्षकांनीही अधिकाधिक बुद्धिमंत होण्याची गरज आहे. ‘रोटरी’चे सचिव सलिल लिमये यांनी आभार मानले.
चौकट
पूरग्रस्तांना मदत
दरम्यान, ‘रोटरी’तर्फे पूरग्रस्त ७० कुटुंबांना मदत देण्यात आली. आणखी ३५० कुटुंबांना मदत दिली जाणार असल्याचे डॉ. ताह्मणकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला रामकृष्ण चितळे, विजय बजाज, अजय शहा, मनिष मराठे, गिरीश तंगडी, यशांक गोकाणी आदी उपस्थित होते.