सांगली : सांगलीतील सेजल पाटील या दहावीतील मुलीने राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस टीन इंडिया’च्या मुकुटावर नाव कोरले आहे. स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने सहा हजार मुलींना मागे टाकले.मुंबईत अंतिम फेरी झाली. सेजलने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेने परीक्षकांना भुरळ पाडत प्रतिष्ठेचा मिस टीन इंटरनॅशनल वर्ल्ड इंडिया पुरस्कार पटकावला. अभिनेत्री मिनिषा लांबा आणि गतवर्षीची विजेती मैथिली भोसेकर यांच्या हस्ते किशोरवयीन सुंदरीचा मुकुट परिधान केला. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत मियामी येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट या संस्थेतर्फे आयोजित स्पर्धेत तिने ‘तुझे ध्येय काय आहे?’ या प्रश्नाला ‘तुमच्यासमोर प्लॅटफाॅर्मवर स्वत:ला सिद्ध करणे आणि त्यावेळी आईवडिलांच्या डोळ्यांत आनंद पाहणे हे ध्येय आहे,’ असे उत्तर दिले. त्याला परीक्षकांनी दाद दिली.
Sejal Patil: सांगलीची सेजल पाटील ठरली ‘मिस टीन इंडिया’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 8:02 AM