बुधगाव : येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांची कोअर इलेक्ट्रिकल कंपनीत कॅंम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड करण्यात आली. ही कंपनी इएचव्ही आणि यूएचव्ही सबस्टेशनवर प्रचलित इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वातावरणामध्ये कार्यरत टेस्ट आणि मापन उत्पादनांची रचना आणि विकास करणारी भारतीय कंपनी आहे.
कंपनीतर्फे महााविद्यालयात घेण्यात कॅंम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्राॅनिक्स ॲड टेलिकम्युनिकेशन विभागातील ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. निवड प्रक्रियेतून पदवी इलेक्ट्रिकल विभागाच्या रितेश प्रदीप कांबळे, धैर्यशील बालाजी पाटील, अनिकेत जोतिराम कोळी, ओंकार वसंत सावंत, नवनाथ सुखदेव खताळ, सुशांत सिद्राम माळी, प्रज्वल संभाजी पाटील, तेजस सुनील वाडकर, सौरभ घेवारे,आकाश भोरे तसेच इलेक्ट्रॅानिक्स विभागाच्या रोहित विनायक खंडागळे यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील, सचिव आदिनाथ मगदूम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष पी. एल. रजपूत यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी आरिफ बुकसेलर व सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.