इस्लामपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी शंभूशाहीर प्रा. अरुण बाबूराव घोडके यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी ही निवड जाहीर केली. समाजाचे नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागात राज्यभर भरीव कामगिरी करणार असून धनगर समाजासह अन्य समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित कलाकारांना सामाजिक न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. घोडके यांनी सांगितले.
इस्लामपूर येथे अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते नूतन प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण घोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील मलगुंडे, शिवाजीराव वाटेगावकर, संभाजी कचरे, पांडुरंग काकडे (नांदेड), माजी आमदार रामहरी रुपनवर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे उपस्थित होते.
फोटो - २९१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर निवड न्यूज
ओळ : इस्लामपूर येथे धनगर समाज महासंघाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. अरुण घोडके यांचा सत्कार अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील मलगुंडे, शिवाजीराव वाटेगावकर उपस्थित होते.