आष्टा : आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ या शाळेची वाळवा तालुका आणि आष्टा केंद्रातून मॉडेल स्कूलसाठी निवड झाली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका व समीर नायकवडी यांनी दिली.
ते म्हणाले, या उपक्रमासाठी अमर भोपे यांच्या प्रयत्नातून काही संगणक या शाळेला देण्यात आले. तसेच बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून एलईडी देण्यात आला. सर्व वर्ग डीजिटल करण्यात आले. या परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करणारे आहेत. बापू साहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण घेता येत आहे.
या शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विक्रम ऊर्फ बाबा भोपे, गणेश जाधव, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, शहाजान जमादार, प्रसाद देसाई, नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा मोटकट्टे, उपनगराध्यक्ष केशव माळी, राजू देसावळे, विकास गायकवाड उपस्थित होते.
फोटो-०८आष्टा२
फोटो ओळ : आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ ची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापिका व समीर नायकवडी यांचा संग्राम शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी विक्रम भोपे, शहाजान जमादार, प्रसाद देसाई, वसंत कांबळे, राजू देसावळे, मनीषा मोटकट्टे आदी उपस्थित होते.