लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व माजी निवृत्त सुभेदार बाजीराव देशमुख यांची शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे. संघटनेच्या झालेल्या निवडणुकीत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व पाच जागांवर विजय मिळवला.
या निवडणुकीत राज्य अध्यक्ष म्हणून बाजीराव देशमुख यांची निवड झाली.
राज्य उपाध्यक्षपदी राजीवजी जामोदकर (जळगाव), सरचिटणीसपदी संतोष मालेवार ( नागपूर), सहसचिवपदी दीपक पाटील ( पुणे) व कोषाध्यक्षपदी विवेक पांडे (यवतमाळ) हे पाचही उमेदवार बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत मावळते अध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर, सरचिटणीस प्रकाश कुलकर्णी, चिटणीस अजय चव्हाण यांनी देशमुख यांच्या समर्थनार्थ महत्त्वाची भूमिका पार पाडली .