बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शकील सिकंदर मुल्ला यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ यांनी काम पाहिले. या ग्रामपंचायतीत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पंचायत कार्यरत आहे.
सूर्यकांत पाटील यांनी उपसरपंचदाचा राजीनामा दिला होता. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच जयंती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत शकील मुल्ला यांची उपसरपंच म्हणून निवड झाली. सूर्यकांत पाटील व शकील मुल्ला यांचा जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
जितेंद्र पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे सत्येत असूनदेखील पदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम समाजाला संधी देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याने या समाजाला न्याय मिळाला आहे.
यावेळी जयश्री पाटील, प्रमोद शिंदे, हेमंत पाटील, अमर पाटील, सीताराम पाटील, कृष्णकुमार वाटेगावकर, अशिष शिंदे आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सुनीता फार्णे यांनी आभार मानले.
फोटो-२३शकील मुल्ला