शिरढोण : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील शुभम आबा कारंडे याची सातव्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत ३८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. कारंडे याची हरियाणा रोहतक येथे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेस निवड झाली आहे.
ही स्पर्धा चागु कान्हा ठाकूर कॉलेज व सातवी स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पनवेल (जि. रायगड) येथे झाली. शुभम याने कुस्ती स्पर्धेत यश मिळविल्यानंतर कुकटोळी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद नामदेव बडरे, एनआयएस कुस्ती कोच संपत्ती येळकर, नामदेव भेलके, संजय चव्हाण, सतीश वाघमोडे, प्रदीप जाधव, सरदार नाळे, राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पवार, पोलीस उपनिरीक्षक पडवळ, बंडू पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
080921\img-20210908-wa0019.jpg
फोटो ओळ-पनवेल जि.रायगड येथे राज्यस्तरीय झालेल्या कुस्ती स्पर्धेत शुभम आबा कारंडे याचा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार करताना त्यांचे कुस्ती कोच आदी.