शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

भाजीपाल्याच्या भावात बेदाण्याची विक्री

By admin | Published: April 12, 2017 9:06 PM

सुकामेवा म्हणून महागड्या खाद्यपदार्थांच्या वस्तूत बेदाण्याची गणना होते. पण कवडीमोल दरामुळे त्याची अवस्था पालापाचोळ्यासारखी झाली आहे.

दत्ता पाटील/तासगाव (सांगली) :सुकामेवा म्हणून महागड्या खाद्यपदार्थांच्या वस्तूत बेदाण्याची गणना होते. पण कवडीमोल दरामुळे त्याची अवस्था पालापाचोळ्यासारखी झाली आहे. निरंकुश विक्री व्यवस्था, उत्पादनाचा वाढत जाणारा खर्च यामुळे बेदाण्याचा उत्पादन खर्चाशी ताळमेळ जुळेनासा झाला आहे. ढासळलेल्या दरामुळे बेदाणा उत्पादकांचे चाक नुकसानीच्या गाळात रूतले आहे.बेदाणा उत्पादनाचे आगर म्हणून तासगावच्या बाजारपेठेची ओळख आहे. तासगाव बाजार समितीतील बेदाणा सौदे राज्यभरात प्रसिध्द आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुकामेवा असणाऱ्या बेदाण्याची वाताहत झाली आहे. महागड्या सुकामेव्याच्या यादीत बेदाण्याचे नाव असले तरी, या बेदाण्याची बरोबरी हंगामी दोन-तीन महिन्यात बाजारात येणारा भाजीपालाही करू लागला असल्याचे चित्र आहे.बेदाणा निर्मितीसाठी एप्रिल महिन्यात होणाऱ्या खरड छाटणीपासून खर्चाला सुरुवात होते. आॅक्टोबर महिन्याच्या आसपास पीक छाटणी झाल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर द्राक्षकाढणी होते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन महिन्याभराच्या कालावधीनंतर तयार केलेला बेदाणा बाजारात विक्रीसाठी येतो. म्हणजे बेदाणा उत्पादन करण्यासाठी वर्षभर सातत्याने कष्ट आणि खर्च करावा लागतो. एकरी तीन हजार पेटी (चार किलो द्राक्षांची एक पेटी) सरासरी द्राक्षांचे उत्पादन निघते. त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. (हवामान चांगले असल्यास, अन्यथा याहीपेक्षा जास्त खर्च येतो.) बेदाणा निर्मितीसाठीची चार किलोच्या एक पेटी द्राक्षांसाठी सुमारे ६० ते ७० रुपये खर्च आहे. त्यानंतर द्राक्षांवर प्रक्रिया करुन बेदाणा निर्मितीसाठी पुन्हा चार किलो द्राक्षांना २५ ते ३० रुपये खर्च येतो. चांगल्या दर्जाची द्राक्षे असतील तर चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. द्राक्षे आणि बेदाणा निर्मितीचा एकूण सरासरी खर्च शंभर रुपयांच्या घरात आहे. हे करत असतानाच अवकाळी पाऊस, बेभरवशाचे हवामान अशा संकटांमुळे नुकसानही सहन करावे लागते.हिरव्या बेदाण्यास शंभर रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत, तर पिवळ्या बेदाण्यास ९० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत दर आहे. सरासरी दर शंभर ते सव्वाशे रुपयांच्या दरम्यानच आहे. बेदाणा बाजार समितीत आणण्यापर्यंतची भूमिका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आहे. मात्र नेमका दर ठरविण्याचे अधिकार शेतकरी, बाजार समितीची यंत्रणा किंवा शासनाच्या हातात नाहीत. बेदाण्याचे दर ठरविण्याचे अधिकार परराज्यातून खरेदीसाठी येणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांच्या हातातच आहेत. त्यामुळे व्यापारी स्वत:च्या सोयीनुसार बेदाण्याचे दर ठरवतात. अनेकदा दर कोसळल्यानंतर, बेदाणा खरेदी करुन व्यापाऱ्यांकडूनच त्याची साठेबाजी केली जाते. त्यामुळे जादा दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. दोन-तीन महिन्यांच्या हंगामी भाजीपाल्याच्या दराएवढाच दर बेदाण्याला मिळत आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, चाक तोट्याच्या गाळात रुतत चालले आहे.उधार विक्री होणारा एकमेव मालबहुतांश शेतीमालासह सर्वच ठिकाणी रोख विक्रीचे व्यवहार होत असतात. बेदाण्याची मात्र शेतकऱ्यांना उधार विक्री करावी लागते. शेतकऱ्यांना एक ते दोन महिन्यांनी पैसे दिले जातात. तात्काळ पैसे हवे असतील, तर झालेल्या किमतीतून दोन टक्के रक्कम कपात केली जाते. ऐन मार्चएन्डच्या काळातच बेदाणा बाजारात येतो. यावेळी बँकेच्या कर्जाच्या फिरवाफिरवीसाठी पैशाची आवश्यकता असल्याने, तातडीच्या पैशासाठी दोन टक्के कमी घेतले जातात. आर्थिक अडचण असल्यास अनेक शेतकरी परस्पर स्टोअरेजवरच कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना बेदाण्याची विक्री करतात.बेदाण्याच्या दराबाबत व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. ती मोडीत काढण्यासाठी शासकीय यंत्रणेचा अंकुश आवश्यक आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव निश्चित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. बेदाण्याची विक्री थेट बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून करण्याचा पर्याय योग्य आहे. मात्र त्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.- सतीश जाधव, बेदाणा उत्पादक, प्रगतशील शेतकरी, मतकुणकी (ता. तासगाव)बेदाणा निर्मितीचा प्रवास...बेदाणा निर्मितीसाठी तयार झालेल्या द्राक्षांवर प्रक्रिया करुन ती बेदाणा रॅकवर आठ ते पंधरा दिवस पसरली जातात. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया करून, निवडून प्रतवारीनुसार बॉक्समध्ये पॅकिंग करून हा बेदाणा मार्केटमध्ये नेला जातो. सरासरी चार किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाणा तयार होतो. मात्र वातावरणात बदल झाल्यास, चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होत नाही. अशावेळी दुय्यम दर्जाच्या बेदाण्यास ३० ते ४० रुपये किलोला दर मिळतो.गवारी ८० रुपये; बेदाणा शंभर रुपये!चार महिन्यात तयार झालेल्या गवारीची बाजारात ८० रुपये किलोने विक्री होत आहे. गवारीचा उत्पादन खर्चही तुटपुंजा असून पैसेही नगद मिळतात. याउलट वर्षभर पैसा, वेळ खर्च करून निर्मिती केलेल्या बेदाण्याचा दर मात्र शंभर रुपये किलो असून, उत्पादन खर्चाइतपतही पैसे हातात येत नसल्याने बेदाणा उत्पादन धोक्यात आले आहेत.