शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

चारशे ते तेराशे रुपयांमध्ये फराळ पाठवा फॉरेनला, यंदा दरात १२ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:23 PM

परदेशातील नातलगांना, मित्रांना सांगलीतील घरच्या फराळाची गोडी चाखता यावी म्हणून कुरिअर कंपन्या व एजन्सीजनी ‘फराळ कुरिअर सेवा’ सुरू केली आहे

सांगली : कोणतेही निर्बंध नसल्याने यंदा सांगलीचा फराळ मोठ्या प्रमाणावर फॉरेनला जाण्याची शक्यता आहे. सध्या काही प्रमाणात यासाठी कुरिअर कंपन्यांकडे बुकिंग सुरु झाले आहे. यंदा कुरिअरच्या दरात १० ते १२ टक्के वाढ झाली असून साडेचारशे ते तेराशे रुपयांपर्यंत विविध देशातील पार्सल सेवेचे दर आहेत.परदेशातील नातलगांना, मित्रांना सांगलीतील घरच्या फराळाची गोडी चाखता यावी म्हणून कुरिअर कंपन्या व एजन्सीजनी ‘फराळ कुरिअर सेवा’ सुरू केली आहे. ऑफर, सवलतींमुळे यंदा प्रतिसाद मिळत असून, अनेक देशांमध्ये सांगलीचा फराळ पाठविण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह वाढला आहे. बाजारपेठेत आनंदाला उधाण आले आहे. अलीकडे अवघ्या काही दिवसांत परदेशात फराळ पोहोच होतो. अमेरिकेसारख्या देशात चार ते पाच दिवसांत फराळ पाठविला जातो. गेल्या सहा दिवसांपासून यासाठी बुकिंग केले जात असून ,फराळ पाठविला ही जात आहे.

असे होते पॅकिंगदिवाळीच्या फराळाला काळजीपूर्वक पॅकिंग करावे लागते. खाद्यपदार्थ फुटण्या-तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बाॅक्समध्ये खालच्या बाजूस वजनास जड व वरील बाजूस हलके खाद्यपदार्थ ठेवले जातात. पॅकिंग केलेल्या अवस्थेत आहे तसे पदार्थ स्वीकारणाऱ्याला मिळतात.

पाठवण्याचा खर्च (वजनाच्या वर्गवारीनुसार)

देश                      ६ ते १० कि.        ११ ते २० कि.अमेरिका, कॅनडा        ९००                  ८७०इंग्लंड                    ४८५                  ४५५जर्मनी                    ११४०                १०९०युएई                     ८१०                  ४२०ऑस्ट्रेलिया             १३३३                 ११७४सिंगापूर                 ४४३                   ४३७न्यूझिलंड               १४११                 १२८०

जास्त वजनाला कमी दर

पार्सलची वजनानुसार वर्गवारी केली जाते. ६ ते १०, ११ ते १५, १६ ते २० व २० ते २५ अशी वर्गवारी केली जाते. जास्त वजनाच्या पार्सलला कमी दर ठेवला आहे.

फराळ परदेशात पाठविण्यासाठी अद्याप फारसा प्रतिसाद नाही, पण दिवाळी आठवड्यावर असल्याने येत्या चार ते पाच दिवसांत बुकिंग वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी परवडणाऱ्या दरात व घरातून पार्सल स्वीकारण्याची सोय केली आहे. देशांतर्गत पार्सल सेवाही सुरु आहे. - प्रथमेश देशमुख, कुरिअर एजन्सी चालक

टॅग्स :SangliसांगलीDiwaliदिवाळी 2022