शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

Lok Sabha Election 2019 सामान्य शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पाठवा: प्रकाश राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:01 AM

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, ...

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, शेतकऱ्यांचा नेता असणाºया सक्षम आणि योग्य उमेदवारास भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी केले.येथील गांधी चौकात हातकणंगले लोकसभा मतदार संघातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत प्रकाश राज बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. राजू शेट्टी, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. शामराव पाटील यांच्यासह आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.सभेची वेळ संपण्याआधी १० मिनिटे अगोदर पोहोचलेल्या प्रकाश राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच ‘वक्त कम है लेकिन सच बोलने के लिए दो मिनिट काफी है’ म्हणत, मोदी सरकारवर तोफ डागली. कलाकारांना राजकारणाची गरज काय? असा प्रश्न विचारला जातो. मात्र आम्ही कलाकार असलो तरी देशातील सर्व धर्माची जनता आमच्यावर प्रेम करते. अशावेळी देशाचा विचार करणे आवश्यक ठरते. देशातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, देशाची सध्या काय परिस्थिती आहे, याचा विचार केल्यानंतर, सरकार विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहत नाही.प्रकाश राज म्हणाले, आम्हाला चौकीदाराची गरज नाही, शेतकरी आणि सामान्य जनतेचा विचार महत्त्वाचा आहे. देशातील प्रत्येकाला शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, त्यासाठी शेतकºयांचा बुलंद आवाज म्हणून खा. राजू शेट्टी यांना विजयी करा.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशामध्ये हुकूमशाहीच्या मार्गाने प्रशासन चालविण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. लालकृष्ण आडवानी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांसारख्या ज्येष्ठांसह इतरांना मोदींनी बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामधून आपल्यापेक्षा वरचढ कोणी होऊ नये, अशा हुकूमशाही पद्धतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सिद्ध होते. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा हे सरकार निवडण्याची चूक करू नये.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञासिंग यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या शहिदांचा अपमान केला आहे. त्यामुळे हा महाराष्टÑ त्याचा बदला घेईल.खा. राजू शेट्टी म्हणाले, गेल्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमधून लढलो. त्यावेळी मोदींनी शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा शब्द दिला होता. मात्र दोनच वर्षात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या गोष्टी नाकारून मोदींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. त्यामुळे मोदींविरोधातील लढ्याची पहिली सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. शेतकºयांना फसवणाºयांना गाडल्याशिवाय सोडणार नाही. प्रत्येक आंदोलनात आमच्याबरोबर राहिलेल्या शिवसेनेनेही भाजपशी युती करून राज्यातील शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. याचे उत्तर उध्दव ठाकरे यांनी द्यावे.यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत केले. आप्पासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अ‍ॅड. आर. आर. पाटील, भगवानराव पाटील, सुश्मिता जाधव, कॉ. धनाजी गुरव, अरुण कांबळे, संदीप जाधव, मनीषा रोटे, प्राचार्य विश्वास सायनाकर, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे यांनी, खा. शेट्टी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.सत्तेच्या लालसेने भाजप-सेना एकत्रआ. पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे गेली चार वर्षे भाजपवर टीका करीत होते, तर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेची धुलाई करत होते. या संपूर्ण काळात जनतेच्या हिताचा कोणताही विचार त्यांच्याकडून झाला नव्हता. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर सत्तेच्या लालसेने भाजप-सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत त्यांचा टिकाव लागणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक