शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सांगलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 2:02 PM

सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे ...

सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आनंदराव (भाऊ) ज्ञानदेव मोहिते (वय ९४) यांचे मंगळवारी निधन झाले. भिलवडी (ता. पलूस) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर १९६१ मध्ये ते वडगणे (कोल्हापूर) हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रूजू झाले. १९६२ मध्ये तासगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. १९६७ ते १९६९ पर्यंत ते तासगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती १९६९ ते १९८२ पर्यंत सभापती राहिले. १९८२ ते १९९० पर्यंत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले. २००१ मध्ये त्यांना राज्य सरकारतर्फे दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवर्षी त्यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली. २००१ ते २००४ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहिले.

काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते यांनी परिश्रम घेतले. १९९० ते २००० या काळात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र मोहिते, ॲड. रमेश मोहिते यांचे वडील, तर माजी जिल्हा सरकारी वकील वसंतराव मोहिते यांचे बंधू होत.

सांगलीत मंगळवारी काँग्रेस भवनासमोर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. काँग्रेस सेवा दलाने सलामी दिली. यावेळी विजया पृथ्वीराज पाटील, विश्वासबापू पाटील, किशोर शहा, मुन्ना कुरणे, करीम मेस्त्री, बिपीन कदम, सनी धोतरे, श्रीकांत जाधव, संजय मेंढे, सी. आर. सांगलीकर, डॉ. शिकंदर जमादार, प्रकाश मुळके, सचिन चव्हाण, अजित ढोले, मौलाली वंटमुरे, अजय देशमुख आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस