शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

जेष्ठ तमाशा कलावंत राजा पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 1:22 PM

गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते.

कवठेमहांकाळ : ज्येष्ठ तमाशा कलावंत, विद्रोही शाहीर राजाराम यशवंतराव पाटील तथा शाहीर राजा पाटील (वय ७०) यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

राजा पाटील संपूर्ण हयात लोककलेसाठी वाहून घेतली होती. ‘बारा हजाराची कमळी’, ‘तुकोबा निघाले वैकुंठाला’, ‘कवठेमहांकाळची लावणी’ या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. १९७० नंतर जे तमाशा फड उदयास आले, त्यातील गुलाब बोरगावकर, गणपत व्ही. माने-चिंचणीकर, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळीकर, काळू-बाळू (कवलापूर) यासारख्या विविध तमाशा मंडळात त्यांनी तमाशा कलावंत, वगनाट्य लेखक, शाहीर, सरदार म्हणून काम केले.त्यांनी ‘रक्ताची आन’, ‘आब्रूचा पंचनामा’ यासारखी नाटके लिहिली. ‘रक्तात न्हाली अब्रू’, ‘इंदिरा काय भानगड’, ‘डॉ. शर्मा’, ‘भक्त पुंडलिक’, ‘टोपीखाली दडलंय काय’, ‘भक्त दामाजी’, ‘खेकडा चालला दिल्लीला’, ‘बापू बिरू वाटेगावकर’ इत्यादी वगनाट्ये लिहिली. याशिवाय लोकशाहीर राजा पाटील लोकनाट्य मंडळाचे ते संस्थापक हाेते. ‘तुकोबा निघाले वैकुंठाला’ या पोवाड्याचे सादरीकरण त्यांनी केेले.गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘विद्रोही तुकाराम’ हा त्यांचा एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली