सांगली : लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिला.
महापालिकेच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नीता केळकर आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, शहरात एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोक राहतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने, व्यापार, उद्योग वाढले पाहिजेत. तसा प्रयत्न शासन करीत आहे. आज तरुणांना सरकारी नोकºया हव्या आहेत. वर्षाला केवळ २० हजार नोकºया निर्माण होऊ शकतात. पण संगणकामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. खासगी कंपन्यांतही चांगले पगार मिळू लागले आहेत. त्यात सरकारने कायदेही कडक करीत नोकरदारांना संरक्षण दिले आहे. अटल पेन्शनसारख्या अनेक योजना आणून निवृत्तीनंतर नोकरदारांना सारे लाभ मिळवून दिले जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. अशा विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वत:च उद्योजक बनून दुसºयांना नोकरी देणारे बनले पाहिजे.
या रोजगार मेळाव्यात ५०० तरुणांना नोकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. गाडगीळ, महापौर संगीता खोत, नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी स्वागत, तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक शेखर इनामदार, योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, भारती दिगडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
टीकेकडे दुर्लक्ष करा : पाटीलमहापालिकेत काम करताना विरोधकांकडून टीका होतच असते. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती तरी टीका झाली. पण ते शांत राहिले. म्हणून ते असंवेदनशील नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी संवेदनशीलता दाखविली आहे. येत्या आठ दिवसात ते काही तरी करून दाखवतील, असेही ते म्हणाले.
सांगलीतील रोजगार मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र खेबूडकर, दिनकर पाटील, संगीता खोत, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.