पेठ (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत कार्यालयात आपत्ती समिती व्यवस्थापनाच्या बैठकीत कृष्णात पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जगन्नाथ माळी, चंद्रकांत पवार, अनिल जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषद मराठी शाळेत विलगीकरणची सोयी केली आहे. रुग्ण सापडलेल्या घरातील सर्वांची चाचणी केली जाणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची व मास्क नसणाऱ्यांची अँटिजन टेस्ट केली जाणार आहे.
जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच चंद्रकांत पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, गावकामगार तलाठी ए. व्ही. मुलाणी, पेठ आरोग्य केंद्राच्या अधिकारी अर्चना कोडग, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पाटील, अमीर ढगे, गोरख मदने, अशोक बागीणकर, श्रीकांत अभंगे, दीपक भोसले, विकास दाभोळे, बजरंग भोसले, आदी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवा सोडून दुपारी चारपर्यंत दुकाने चालू ठेवण्यात येणार आहेत. विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहापाण्याची सर्व सोय व्यंकटेश्वरा शिक्षण समूहातर्फे करणार असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.