सांगलीतील ज्ञानयोगी फौंडेशनतर्फे कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयाेजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. शिबिरात १२५ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या डॉ. शिरगावकर रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.यावेळी महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजयराव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षानंदजी स्वामी म्हणाले, आपली समाजाला मदत कशी होईल, याचे सतत भान असले पाहिजे. निसर्ग, झाड, पशु-पक्षी यांसारखे परोपकारी जीवन जगता आले पाहिजे. ज्ञानयाेगी फाैंडेशनचे कार्य समाजाला प्रेरक आहे.
डॉ. सोमशेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प.पू. ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या या ट्रस्टचे कार्यदेखील स्वामीजींच्या ‘मानवता हाच धर्म’ या उक्तीप्रमाणे सुरू आहे. सांगली परिसरातील पूरपरिस्थितीत, कोरोना महामारीच्या काळात फौंडेशनने लक्षवेधी काम केले.
यावेळी विजयराव पाटील, विशाल दुर्गाडे यांनीही मनाेगत व्यक्त केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. शिरीष काळे, अविनाश पोरे, महावीर खोत, विपुल पाटील, एस. व्ही. माळी, फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत माळी, उपाध्यक्ष सागर पाटील, खजिनदार सुरज निळकंठ, सचिव उमाकांत माळी उपस्थित होते.
अॅड. सचिन हंडीफोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. सी. माळी यांनी आभार मानले. नितीन पाटील, अरुण राजमाने, राजाराम माळी, वैभव परमणे, विजय होगाडे, नितीन गौराजे, मंगेश पाटील, मुकुंद माळी, महावीर भोरे, संदीप गौराजे, कय्युम तांबोळी यांनी संयाेजन केले.
फाेटाे : १३ दत्ता