सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील पसायदान मुलींचे अनुदानित वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. कुरळप (ता. वाळवा)पाठोपाठ सांगलीतही तसेच प्रकरण उजेडात आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी संस्थेच्या संस्थापक, मुख्याध्यापकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्यांमध्ये संस्थापक नंदकुमार ईश्वराप्पा अंगडी (वय ५७, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सांगली), मुख्याध्यापक आप्पासाहेब महावीर करांडे (४२, यशवंतनगर, सांगली), कर्मचारी संजय अरुण किणीकर (३६) व त्याची पत्नी वर्षाराणी संजय किणीकर (२८, दोघे रा. पसायदान शाळा, कर्नाळ रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे.वसतिगृहामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींच्या निवासाची सोय आहे. संजय किणीकर व त्याची पत्नी वर्षाराणी वसतिगृहाची देखरेख करतात. सध्या २३ मुली आहेत. मुलींच्या खोल्यांच्या दरवाजांच्या कड्या मोडल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी संस्थेने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी मुली दरवाजा पुढे करुन झोपतात. वसतिगृहातीलच एका खोलीत संशयित किणीकर दाम्पत्य राहते. रात्रीच्यावेळी संजय किणीकर हा वसतिगृह परिसरात विनाकारण फिरत असे. चार महिन्यांपूर्वी एक मुलगी लघुशंकेसाठी खोलीबाहेर आली होती. तेव्हा किणीकर तिथे उभा होता. तो या मुलीकडे पाहत थांबला. त्यामुळे मुलगी घाबरुन खोलीत आली. तिने खोलीतील मुलींना प्रकार सांगितला. दुसऱ्यादिवशी मुलींनी संस्थापक अंगडी याच्याकडे तक्रार केली होती. पण अंगडी याने किणीकरवर काहीच कारवाई केली नाही.पालकांमुळे वाचा फुटलीदोन दिवसांपूर्वी काही मुलींचे पालक त्यांना भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी मुलींनी पालकांकडे किणीकर हा गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक छळ करीत आहे, तसेच संस्थापक व मुख्याध्यापक त्याला पाठीशी घालत आहेत, अशी तक्रार केली. त्यामुळे पालकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर संस्थापक अंगडीसह चौघांना अटक केली.मुलींनाच दमबाजीनोव्हेंबर २०१८ मध्ये रात्रीच्यावेळी किणीकर मुलींच्या खोलीत शिरला. झोेपत असलेल्या मुलींच्या पायाला त्याने स्पर्श केला. एक मुलगी जागी होताच किणीकरने तिचा हात पडला. ‘तू माझ्यावर पे्रम करतेस की नाही, खरे सांग’, असे तो म्हणाला. या मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करुन घेऊन ती दुसºया खोलीत जाऊन झोपली. दुसºयादिवशी सर्वच मुलींनी संस्थापक अंगडी, मुख्याध्यापक करांडे यांच्याकडे तक्रार केली. पण या दोघांनी मुलींना, हा प्रकार कोणाला सांगू नका, नाही तर तुम्हाला नापास करेन, अशी धमकी दिली.पत्नीची अरेरावीसंशयित किणीकरची पत्नी वर्षाराणी किणीकर हिने मुलींना बोलावून घेतले. ‘माझ्या पतीचे नाव घ्यायचे नाही, नाही तर तुम्हाला सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तिने अरेरावीची भाषा केली.
सांगलीतील वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:48 PM