शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
2
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
3
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
4
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
5
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
6
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
7
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
8
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
9
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
10
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
12
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
13
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
14
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
15
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
16
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
17
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
18
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
19
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
20
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

शब्दरंग-डोंगरी साहित्य परिषदचे पुरस्कार जाहीर, फेब्रुवारीत साहित्य संमेलनामध्ये होणार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 7:01 PM

गंगाराम पाटील  वारणावती : शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ व डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने २०२० ते २०२२ चे उत्कृष्ठ ...

गंगाराम पाटील वारणावती : शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ व डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने २०२० ते २०२२ चे उत्कृष्ठ साहित्य निर्मिती चे डोंगरी साहित्य पुरस्काराची आज घोषणा परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील, उपाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी  केली. पद्यविभागात शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार -प्रतिथयश कवी विजय चोरमारे यांच्या  'स्तंभसूक्त' या कविता संग्रहाला आणि अहमदनगर येथील प्रसिद्ध कवयित्री माधुरी मरकड यांच्या  'रिंगण ' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.तसेच गद्यविभागात उद्योजक बळीराम पाटील चरणकर डोंगरी साहित्य पुरस्कार  सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या 'आठवणीच्या पारंब्या ' या ललितलेखसंग्रहाला आणि पंढरपूर येथील साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव यांच्या  'साहित्याची अस्वादक समीक्षा' या समीक्षाग्रंथास जाहीर झाला आहे.रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसह २०१९ चेही डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर केलेप्रमाणे पुरस्कार वितरण फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.दोन वर्ष कोरोना संकट काळात साहित्य संमेलन घेता आले नाही त्यामुळे दोन वर्षातील पुरस्कार वितरण झाले नव्हते. यावेळी शब्दरंग व डोंगरी साहित्य परिषदेचे  सचिव मन्सूर नायकवडी कोषाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारिणी  सदस्य प्रकाश जाधव, प्रतापराव शिंदे नथुराम कुंभार अविनाश जाधव संपत काळे श्रीरंग किनरे आदी सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली