मोहन मोहिते वांगी: वांगी ( ता . कडेगांव ) येथील स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव शंकरराव निकम याच्या घराच्या समोर व मागील दरवाज्यास विद्युत वाहक तारे ११ केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. मात्र, ११ केव्ही विजेवर करंट दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्यामुळे सुदैवाने निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले.अशोक निकम हे वांगी गावाच्या उत्तरेस असणार बिरोबाचीवाडी रोड लगत असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. काल, मंगळवारी निकम आपली पत्नी व दोन मुलासह जेवण करून झोपी गेले. रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र घराजवळ ट्रान्सफार्मर असल्यामुळे त्यांनी ट्रान्सफार्ममध्ये जाळ झाला असेल समजून दुर्लक्ष केले. मात्र दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. बॅटरीच्या साह्याने बाहेर पाहिल्यास त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजा जवळ अडकवलेली दिसून आली.असा होता डाव...११ किव्ही या तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले. तर अज्ञात लोकांनी कंरट दिलेली वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्या वायरला एक हजार फूट लाब हिरव्या रंगाची नायलॉन रशी बांधून ती उसातून जोडुन ठेवली होती. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते त्यात असफल झाले अन् घटनास्थळापासून पलायन केले.निकम कुटुंब बचावले...या प्रकरणातून निकम कुटुंब सही सलामत बचावले आहे. सदर घटनेची माहिती चिंचणी - वांगी पोलीसांना देण्यात आली. मात्र आज, बुधवार (दि. ४) सकाळपर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.
Sangli: स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचे कुटुंब संपवण्याचा डाव, घराला दिला ११ केव्ही विजेचा करंट
By हणमंत पाटील | Published: October 04, 2023 12:05 PM