कुंडल येथे प्रोजेक्ट क्रांती या नावाने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आपली चुणूक दाखवण्यासाठी नि:शुल्क स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. येथे आजवर शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कित्येकांनी यशही संपादन केले आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आणि पुस्तकांची निकड लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शरद लाड यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा स्वीकार केला जाणार आहे. यासाठी आवश्यक पुस्तके क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर सवलतीच्या दरात देण्याची व्यवस्था केली आहे तरी कार्यकर्ते, हितचिंतक यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शरद लाड हे कारखाना कार्यस्थळावर दि. १५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.