शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 12:05 PM

सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील

सांगली : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही उमटले. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यामुळे जबरदस्त धक्का बसला असून, पदांच्या राजीनाम्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. आमदारांनीही पवारांच्या या निर्णयानंतर चिंता व्यक्त केली.मंगळवारी दुपारी शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर सांगलीच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली. सोशल मीडियावरील पक्षाच्या ग्रुपवर नाराजीची भूमिका मांडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी क्रमांक एकवर आहे. सर्वाधिक आमदार व संस्थास्तरावर सर्वाधिक ताकद असलेला हा पक्ष असल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पक्षीय गोटात दुपारनंतर अस्वस्थता पसरली. अनेकांनी पक्षाच्या भवितव्याबाबत चिंताही व्यक्त केली.यांनी दिले राजीनामेपक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापाैर सुरेश पाटील, तसेच प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांनी तातडीने राजीनामे देऊन शरद पवारांच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षात काम करणे आमच्यासाठी कठीण असेल, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

सर्वच पदाधिकारी राजीनामे देतीलशरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, तसेच बुथप्रमुखसुद्धा राजीनामे देतील, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मांडली.

तिन्ही आमदारांची नाराजीपक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व आमदार सुमनताई पाटील यांनीही शरद पवारांच्या या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली. त्यांनीच पक्षाचे अध्यक्षपद यापुढेही भूषवावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

शरद पवारांशिवाय पक्षाची कल्पनाच करवत नाही. संपूर्ण देशात प्रभावी असणारे ते व्यक्तिमत्त्व आहेत. अन्य राज्यांमध्येही त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला जातो. त्यामुळे तसे दुसरे नेतृत्व मिळणे मुश्कील आहे. त्यामुळे शरद पवारांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असा आमचा आग्रह आहे. - आमदार मानसिंगराव नाईक 

शरद पवार यांचा पक्षाला मोठा आधार आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची प्रगती झाली आहे. अनेक नेते त्यांनी घडविले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये. - आमदार सुमनताई पाटील

शरद पवारच पक्षाची ओळख आहेत. त्यांच्यामुळेच ऊर्जेने, ताकदीने नेते, कार्यकर्ते काम करतात. त्यांच्यामुळे पक्षाचे अस्तित्व आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा आमचा आग्रह असेल. - अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार