करगणी
: आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात कोरोना रुग्णांची संख्या १५० झाली आहे. रविवारी पहाटे एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने मंगळवारपासून पाच दिवस गाव बंदचा निर्णय घेतला आहे.
शेटफळेमध्ये कोरोना रुग्णसंख्या गेल्या दोन आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंता करणारी ठरत असून रविवारी पहाटे एका तरुणाचा कोरोनाने बळी गेला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेटफळे गावातील रुग्णालये, औषध दुकाने व दूध डेअरी वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत औषध दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
याशिवाय गावात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा आपत्ती व्यवस्थान समितीने दिला आहे.
चोकट
दारू विक्री
दरम्यान, शेटफळे ग्रामपंचायतीने सोशल मीडियावर पाठवलेल्या संदेशामध्ये शेटफळे गावात चोरून दारू, गुटखा विक्री केली जात असल्याचे नमूद केले आहे. शेटफळेमध्ये एकही परवानाधारक दारू विक्री दुकान नाही; मात्र अनेक वर्षांपासून पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्री सुरूच आहे. हे ग्रामपंचायतीच्या संदेशाने स्पष्ट होत आहे.