शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

शि. द. पाटलांनी पोत्याने पैसे पळविले!

By admin | Published: January 24, 2016 12:33 AM

दिलीपतात्या पाटील : शिक्षक संघात अधिवेशनाच्या पैशातूनच फूट

सांगली : शि. द. पाटील यांनी माझे वडील लालासाहेब पाटील यांच्याशी दगाबाजी करूनच शिक्षक संघाचे अध्यक्षपद भूषविले. ज्यांनी त्यांना अध्यक्ष केले, त्यांनाही पुढे दगा देऊन राष्ट्रीय अध्यक्षपद बळकावले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी अधिवेशने घेऊन पोत्याने पैसे पळविले असून, याचा कधीच हिशेब दिला नाही. त्यांना संभाजीराव थोरातांनी पैशाचा हिशेब मागितला आणि संघाचे राज्यात तुकडे झाले, अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शनिवारी येथे केली. शिक्षक संघातर्फे संघटनेचे नेते संभाजीराव थोरात, एस. डी. पाटील आणि आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, माझे वडील शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना राज्याध्यक्षपदी निवडण्याचे आदल्यादिवशी ठरले होते, पण रात्रीत काहींनी सूत्रे फिरविली आणि सकाळी सांगलीत झालेल्या अधिवेशनामध्ये शि. द. पाटील यांना राज्याध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. पुढे शि. द. पाटील यांनी अधिवेशने घेऊन केवळ पैसे गोळा करण्याचाच उद्योग केला. कुठल्याही अधिवेशनाच्या पैशाचा हिशेब दिला नसल्याच्या तक्रारी आहेत. शि. द. पाटील आणि संभाजीराव थोरात यांच्यातील फूटसुध्दा अधिवेशनाच्या पैशातूनच झाली आहे. चुकीच्या माणसाच्या हातात कारभार दिल्यामुळे किती नुकसान होते, याचा शिक्षकांनी अनुभव घेतला आहे. शि. द. पाटील यांच्या संघटनेत ते स्वत:च राहतील, कोणीही शिक्षक तिकडे फिरकणार नाही. थोरात यांनी दोन संघटना म्हणून कारभार करू नये. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. थोरात म्हणाले की, दि. ६ फेबु्रवारीला नवी मुंबई येथे शिक्षक संघाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष एस. डी. पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष तानाजीराव खोत, हंबीरराव पवार, सतीश पाटील, अरुण पाटील, शोभाताई शिंदे आदींची भाषणे झाली. संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक बँकेचे संचालक अविनाश गुरव यांनी स्वागत केले. यावेळी शशिकांत माणगावे, संजीवनी जाधव, नागम्मा बेळुंखी, जीवन सावंत आदी उपस्थित होते. शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी धनश्री घाटगे यांची, तर सरचिटणीसपदी संजीवनी जाधव, कार्याध्यक्षपदी शोभाताई शिंदे, सल्लागारपदी सुधाताई कोळी यांची निवड करण्यात आली. (वार्ताहर)