संख : प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार सत्ताधारीने काटकसरीने करावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केली आहे.
शिक्षक बँकेच्या माध्यमातून शिक्षक गरजांसाठी कर्ज घेतात; परंतु बँकेचा कर्जाचा व्याजदर जास्त आहे. शिक्षकांना बँकेच्या मनमानी व्याजदराचा मोठा फटका बसत आहे. इतर बँका सभासदाभिमुख योजना राबवून कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचे धोरण आखत आहेत.
नोकर भरती थांबविण्यात यावी. व्याजदर कमी करून कर्जदारांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मृत सभासदांचे पूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, सभासदाचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी बँकेच्या वतीने किमान पाच हजार रुपयांची मदत करण्यात यावी.
सभासदांच्या आर्थिक हिताचा विचार करून दोन अंकी लाभांश द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस गुंडा मुंजे, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष तानाजी टेंगले, मारुती आवटे, सुदाम कराळे, विष्णू ठाकरे, अशोक मुचुंडी, मनोहर येऊल, भालचंद्र गडदे, प्रकाश गुदळे, भगवान करांड, योगेश अहिरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.