शिराळा : काँग्रेसचे सर्व समविचारी नेते, कार्यकर्ते यांना एकत्र करून सत्यजित देशमुख यांना बळ देणार आहोत. या मतदारसंघाचा इतिहास पाहता, आतापर्यंत आघाडीच्या समीकरणामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि काँग्रेससाठीच राहील. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केले.शिराळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, माजी जिल्हा परिषद. सदस्य के. डी. पाटील, शाहुवाडीचे करणसिंह गायकवाड, कºहाडचे विशाल पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस निरीक्षक प्रकाश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिजित पाटील म्हणाले, वसंतदादा घराणे, देशमुख घराणे व पाटील कुटुंबियांचे अनेक दिवसांचे संबंध आहेत. मध्यंतरी काही कारणांनी हे संबंध दुरावले होते. परंतु यापुढील काळात ते दृढ होतील.सी. बी. पाटील म्हणाले, विधानसभा ताकदीने लढवायची आहे. यादृष्टीने सर्वांनी काम करावे. शिवाजीराव देशमुख यांचे कुटुंबीय नेहमीच सर्वांच्या सुख—दु:खात सहभागी असतात. सत्यजित देशमुख यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केला, या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे.
दक्षिण कºहाड युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव थोरात, प्रदीप जाधव, जि. प. सदस्य विशाल चौगुले, परशु शिंदे, हेमंत कुरळे, पृथ्वीराज पाटील, अशोक पाटील, संपतराव शिंदे, जयसिंगराव शिंदे, अजय देशमुख, सचिन देशमुख, रणजित पाटील, विकास नांगरे, अंकुश नांगरे, मोहन पाटील, डॉ. दिलीप खोत, उत्तम गावडे, धनाजी नरुटे, मनोज चिंचोलकर, राजवर्धन देशमुख उपस्थित होते.सत्यजित देशमुखांच्या नेतृत्वाला : देणार बळकटीविशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीतून मी व सत्यजित देशमुख दोघेही आमदार होणार आहोत. काँग्रेसशिवाय हा मतदारसंघ दुसऱ्या कोणाला दिलेला नाही, यापुढेही देणार नाही. शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट होत असणाºया सर्व जुन्या, समविचारी नेत्यांना एकत्र करून सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाला बळकटी देणार आहे.