शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

शिराळ्यात आरोग्य विभागच सलाईनवर

By admin | Published: November 09, 2014 10:53 PM

दोनच अधिकारी : ग्रामीण रुग्णालयात यंत्रणाच नाही

विकास शहा-शिराळा  तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर आहे. कोकरुड ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना आहे, तर शिराळा या तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात दोनच डॉक्टर! यामुळे आरोग्य व्यवस्था म्हणजे ‘असून खोळंबा नसून घोटाळा’, अशी परिस्थिती आहे. एवढी बिकट परिस्थिती असूनही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी डॉक्टरांची भरती करीत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल.डोंगरी विभाग म्हणून हा तालुका ओळखला जातो. त्यामुळे डोंगर-कपारीत राहणाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळणे अवघड झाले आहे. नुसत्या रुग्णालयाच्या इमारती आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती आहे. त्यामुळे फक्त प्रशासकीय खर्चच होत आहे. मात्र आरोग्य सुविधेचे वाभाडे निघत आहेत. जर वैद्यकीय अधिकारीच नसेल, तर त्या सुविधेचा काय उपयोग? असा सवालही रुग्णांना पडत आहे. कोकरुड हे विधानपरिषद सभापती यांचे गाव. याठिकाणी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र अशी दोन रुग्णालये. यामधील ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी, अशा चार डॉक्टरांच्या नेमणुका आहेत. मात्र यापैकी एकही जागा भरलेली नाही. त्याचबरोबर येथे १५ इतर कर्मचारी आहेत. या ठिकाणी डॉक्टर नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर मात्र लाखो रुपये पगाराच्या नावाखाली खर्च होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर पाहिजेत. मात्र याठिकाणी एकच डॉक्टर आहे. ही एकच व्यक्ती ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन्ही ठिकाणी तपासणी करीत असते. त्यामुळे त्यांचीही धावपळ होते. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी अशी चार पदे आहेत. यातील अधीक्षक पद २००४ पासून रिक्त आहे. सध्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व एक वैद्यकीय अधिकारी असे दोनच डॉक्टर आहेत. त्यामुळे हे दोन डॉक्टर कोण-कोणती कामे करणार? हा प्रश्न आहे. येथील एक्स-रे मशीन बंद आहे, कारण टेक्निशियनच नाही. तालुक्यात सात प्राथमिक केंदे्र आहेत. त्यापैकी चरण, सागाव, कोकरुड, शिरशी येथे एकेकच डॉक्टर आहे. फक्त अंत्री, मणदूर, मांगले या ठिकाणी दोन-दोन डॉक्टर आहेत. ही अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राची! याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर आता कोकरुडला नवीन इमारत मंजूर झाली आहे, तर शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. जर अशी सुविधा आरोग्य विभागाकडून मिळत असेल, तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल केला जात आहे. येथील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.