शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 2:02 PM

‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’

सांगली : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लोकवर्गणीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने गुरुवारी सांगलीत निदर्शने केली.सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. ‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’, ‘युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेत्याचा निषेध असो’, असे फलक झळकावत जिल्ह्यातील शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबत शिवसेनेने जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, १९७१ च्या युद्धात अतुलनीय पराक्रम करणाऱ्या आयएनएस विक्रांत या देशगौरवी युद्धनौकेच्या जतन आणि संवर्धनासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे नाटक करून भाजपच्या किरीट सोमय्या आणि त्याच्या टोळीने भ्रष्टाचार केला. हडप केलेली रक्कम ५८ कोटीच्या घरात असल्याचे समजते. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राजभवनाकडे अशाप्रकारे कोणत्याही रकमेचा भरणा झालेला नाही. याचाच अर्थ लोकांच्या देशभक्तीच्या भावनेला आपल्या चंदा गोळा करण्याच्या उद्योगासाठी पणाला लावून किरीट सोमय्या आणि त्याच्या टोळीने ही रक्कम हडप केली आहे.मनी लॉन्ड्रिंग केलेल्या या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी करावी. संबंधितांना अटक करून हडप केलेले ५८ कोटी वसूल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात दत्ता इंगळे, चंदन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महादेव मगदूम, विशाल सिंग राजपूत, हरीदास लेंगरे, मयूर बोडके, हेमाताई कदम, सुनिता पाटील, मनीषा पाटील, रुपेश मोकाशी, नितीन काळे, राम काळे, किशोर पाटील, सचिन कांबळे, गजानन मोरे, सुगंधा माने, शकीला जमादार, तमन्ना सातार्डेकर, कमल सोनटक्के, गीता गडकरी, लक्ष्मी बामणे, सरोजनी माळी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना