इस्लामपूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रस्ता क्रमांक १५१ आटपाडी, पेठवडगाव, आष्टा, भिलवडी, तासगाव, शिगाव, बागणी, दिघंजीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज निकम यांनी केला आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच या कामावरती देखरेख करणाऱ्या बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज निकम, उपतालुकाप्रमुख अंकुश माने, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख भूषण भासर, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख घनश्याम जाधव, नगरसेवक प्रदीप लोहार, राजेंद्र पवार, कृष्णात पाटील, विनोद शेवाळे, सुनील पवार, रामचंद्र कानसे, योगेश पवार, दीपक पाटील, राजाराम पाटील, परशुराम बामणे, रवींद्र खोत, योगेश हुबाले, शशिकांत नगारे, रंजीत कदम, श्रीकांत क्षीरसागर हे शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
फोटो - १४०१२०२१-आयएसएलएम- शिवसेना आंदोलन न्यूज
इस्लामपूर येथे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज निकम यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.