शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

कन्याकुमारीहून आणलेल्या शिवज्योतीचे चिंचणीत दिमाखात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:51 PM

कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवप्रेमी तरुणांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीचे  औचित्य साधून कन्याकुमारी ते शिवस्मारक चिंचणी आशा १३४२ किमी अंतराच्या शिवज्योत ...

कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवप्रेमी तरुणांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीचे  औचित्य साधून कन्याकुमारी ते शिवस्मारक चिंचणी आशा १३४२ किमी अंतराच्या शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.ही शिवज्योत मोहीम ४५ जिगरबाज तरुणांनी फत्ते केली असून सोमवारी तिथीनुसार शिवजयंतीदिनी शिवस्मारक चिंचणी येथे  शिवज्योत दाखल झाली. चिंचणी व सोनहीरा खोऱ्यातील तरूणांनी व ग्रामस्थांनी सागरेश्वर ते चिंचणी दुचाकी रॅली काढून शिवज्योतीचे स्वागत केले.स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी (तामिळनाडू) येथून २५ एप्रिल रोजी युवा नेते दिग्विजय कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून निघाली. शिवरायांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा असलेली शिवज्योत घेऊन तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, गोवा राज्यातून धावणाऱ्या तरुणांना गलाई असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे, युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्यासह तेथील गलाई बांधवांनी सर्वोतोपरी मदत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. दरम्यान राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही या शिवप्रेमी तरुणांची विचारपूस करून शुभेच्छा दिल्या.कन्याकुमारीहुन निघालेली शिवज्योत रविवारी १ मे रोजी  सायंकाळी सागरेश्वर येथे पोहोचली. सोमवारी सकाळी चिंचणीसह सोनहीरा खोऱ्यातील हजारो तरुण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुचाकी रॅलीने  शिवज्योत शिवस्मारक चिंचणीकडे रवाना झाली. दरम्यान देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद,व चिंचणी येथील ग्रामस्थांनी शिवज्योतीचे स्वागत केले. काल, सोमवारी ही शिवज्योत शिवस्मारक चिंचणी येथे  दिमाखात आणली.

टॅग्स :SangliसांगलीShivjayantiशिवजयंती